Universal Prayer/mr

De Simple Silence.

[modifier] प्रभु प्रार्थना

हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा

तू अद्वितीय व अतूलनीय आहेस, तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही ।

तुझ्या ठायी रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत ।

तू अमर्यांद आणि अगाध आहेस । तर्क व कल्पना या पलिकडे आहेस ।

तू सनातन व अविनाशी आहेस । तू अविभाज्य आहेस ।

दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही ।

तू सतत होतास सतत आहेस व सतस राहशीलही ।

तू सर्वं ठिकाणी आहेस, सर्वांत आहेस आणि सर्वाच्या पलीकडेही आहेस ।

तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस, तू व्यक्त व अव्यक्त ही आहेस आणि सर्वं भुमिकाच्या पलिकडे आहेस ।

तू तीनही भुवानत आहेस, त्रिभुवना पालीकडेही आहेस, तू अगोदर असून स्वतंत्र आहेस, तू विश्वकर्तां देवदेवेश्वर आहेस ।

तू सर्वं मानांचा व हृदयाचा ज्ञाता आहेस ।

तू सर्वशक्तिमान व सर्वांव्यापी आहेस । तू अनंत ज्ञान, अपरिमीत शक्ती व असीम आनंद आहेस ।

सर्वंज्ञ व अनंत ज्ञानी आहेस । भूत वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस ।

तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस ।

अनंत गुणांनी नटलेला तू आत्मयांचा आत्मा आहेस ।

सत्य ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस ।

तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस ।

अदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस ।

तू प्रभू व परमेश्वर आहेस । तू अल्लाह, इलाही, याझ्दान, आहुरमझ्द व प्रियतम परमेश्वर आहेस । पुजार्ह किंवा एकमेव पुजनिय असे म्हणतात ।

Navigation