Avachita parimalu/mr
De Simple Silence.
| Languages/langues: |
English • मराठी |
अवचिता परिमळू
अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले । ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
मज करा कां उपचारु अधिक ताप भारु सखिये सारंगधरु भेटवा कां
तो सावळा सुंदरू कासे पितांबरू । लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
भरलिया द्रुष्टी जंव डोळा न्याहाळी तंव कोठें वनमाळी गेला गे माये
बोधुनी ठेलें मन तव जालें आन । सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा । तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
संत ज्ञानेश्वर
